Tuesday, March 14, 2017

** शबाना आझमी **


सिनेमा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.रोजच्या धावपळीत मनोरंजनाचे हलकेफुलके क्षण या सिनेमामुळे आपण अनुभवतो. प्रेमकथा , हिरो हिराॅईन , व्हिलन , काॅमेडियन वगैरे आणि ठासून भरलेला मसाला आणि गोड शेवट असा सिनेमा लोकांना आवडतो. हिराॅईन म्हणजे सौंदर्याची खाण अशी आपली समजूत असते. सौंदर्य कुणाला आवडत नाही? माझी पण अशीच समजूत होती. मला सुद्धा सुंदर हिराॅईन आवडतात.
पण पुढे मी प्रादेशिक सिनेमा पहायला लागले. दूरदर्शनवर असे सिनेमे नेहमी दाखवतात. अशातच एकदा श्याम बेनेगलांचा "अंकुर" लागला होता.विषय तसा गंभीर होता. त्यात शबाना आझमी हिराॅईन होती. मला वाटलं काहीतरी रटाळ असणार कारण शबाना आझमी मला मुळीच आवडायची नाही. रूढार्थाने ती सुंदर नाही.पण अंकुर पाहिला आणि सिनेमा पाहण्याची माझी दृष्टीच बदलली. जे काही पाहिलं ते कमाल वाटलं. सौंदर्यापलीकडेही अभिनय ही गोष्ट असते हे मला समजलं.
मग काय? मंडी , साज, अर्थ , पेस्तनजी, मासूम धारावी, दिशा,जज्बा, चाॅक अॅन्ड डस्टर , अनोखा बंधन , अवतार असे सगळे सिनेमे मी पाहिले. मग ती माझी सर्वात आवडती हिराॅईन झाली. तिचे बोलके डोळे ही जमेची बाजू आहे. डोळ्यातील भाव ती इतक्या सुंदर पद्धतीने व्यक्त करते की काळजाचा ठोका चुकतो.

Tuesday, November 10, 2009

कालपासून पावसाने अवेळी हजेरी लावल्याने खुप विस्कळींतपरिस्थिति आहे . हिवाळ्यात इतका मुसळधार पाउस म्हणजे ख़रच काळजी करण्याची गोष्ट आहे .हा सगळा पृथ्वीच तापमान वाढल्याचा परिणाम आहे अस बोलल जातआहे.कालच्या सकाळमध्ये एक लेखात असाच म्हटले आहे की याच भाकित पूर्वी केला होत.आजची परिस्थिति ही global warming मुळें निर्माण झाली आहे पण यासाठी फ़क्त शास्त्रदन्य लोकानी अभ्यास करून पुढे काय होइल याचा शोध घेण पुरेस आहे का ? आपणही यावर विचार कारण गरजेच नाही का? तुम्हाला काय वाटत?